Dutta Puran + Duttareya Pure Silver Frame (Dutta Jayanti Special Combo Pack)
- Regular price
- Rs. 600.00
- Regular price
-
- Sale price
- Rs. 600.00
- Unit price
- per
Notified by email when this product becomes available
Rs. 600.00
- Description
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असणाऱ्या भगवान दत्तगुरूंचा भक्तसंप्रदाय बराच मोठा आहे. म्हणूनच भगवान दत्तात्रेयांशी संबंधित बरेच ग्रंथ प्रचलित आहेत. श्रीगुरुचरित्र, गुरुलीलामृत, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्यांसारख्या अनेक ग्रंथांचे पठण दत्तभक्त अनन्य श्रद्धेने करतात. ह्याच मालिकेत गणना करता येईल असा एक ग्रंथ म्हणजे दत्तभक्तशिरोमणी श्री वासुदेवानंद सरस्वती ह्यांनी चातुर्मासात गंगातीरी ब्रह्मवर्तामध्ये लिहिलेले 'दत्तपुराण'. व्यासांनी लिहिलेल्या १८ पुराणांएवढेच महत्त्वाचे पुराण. ह्या ग्रंथाची रचना ऋक्संहितेप्रमाणेच असून त्यामध्ये ३५०० श्लोक आहेत. त्यांची विभागणी ८ भागांमध्ये केलेली असून प्रत्येक भागात ८ असे एकूण ६४ अध्याय आहेत.
भगवान श्रीगुरु दत्तात्रेयांबद्दलची माहिती, त्या अनुषंगाने येणाऱ्या कथा, दत्तमाहात्म्य, दत्तभक्तीचे फळ ह्याबद्दल ह्या ग्रंथामध्ये लिहिले आहे. दत्तभक्तांच्या संग्रही आणि नित्यवाचनात असावा असा हा सुबोध ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाचे संपादक बापटशास्त्री आहेत.
येत्या मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने आवर्जून वाचला जावा असा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ आणि श्रीदत्तगुरुंची चांदीची सुंदर फ्रेम ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आमच्या श्री गजानन बुक डेपोमध्ये मिळतील. लवकरात लवकर आपली प्रत ऑर्डर करा.