कुंभ राशीतील जातकांसाठी हे वर्ष बरेच काही प्रदान करणारे वर्ष सिद्ध होईल. तुमचा राशी स्वामी शनी देव तुमच्याच राशीमध्ये पूर्ण वर्ष कायम राहतील. हे तुमच्यासाठी प्रत्येक पद्धतीने शुभ परिणाम घेऊन येईल. तुमच्या जीवनात अनुशासन वाढेल. तुम्ही प्रत्येक काम पूर्ण मेहनतीने आणि मन लावून कराल यामुळे कार्य क्षेत्रात ही तुमचे उत्तम स्थान कायम राहील. तुमची मेहनत तुम्हाला इतर लोकांपासून पुढे ठेवेल. देव गुरु बृहस्पती 1 मे पर्यंत तुमच्या तिसऱ्या भावात राहून तुमच्या कमाई मध्ये वाढीचे कारण बनेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनात ही अनुकूल वेळ असेल. व्यापारात वृद्धी योग बनतील आणि भाग्य वृद्धी ही होईल. 1 मे नंतर देव गुरु बृहस्पती चतुर्थ भावात जाऊन कौटुंबिक संबंधांना अनुकूल बनवण्यासाठी तुमची मदत करेल.
वर्षाच्या सुरवाती मध्ये सूर्य मंगळाच्या प्रभावाच्या कारणाने प्रेम संबंधात काही तणाव वाढू शकतो, जे वर्षाच्या उत्तरार्धात अनुकूल होईल. तुम्ही आपले नाते निभावण्याचा पूर्ण प्रयत्न कराल जे हळू हळू यशस्वी होईल आणि प्रेम संबंध घट्ट होतील. करिअर च्या बाबतीत तुम्हाला उत्तम यश मिळेल. शनी महाराज तुमच्या कडून मेहनत करवून घेईल जे तुम्हाला नोकरी आणि व्यापार दोन्ही क्षेत्रात उत्तम यश प्रदान करेल. विद्यार्थ्यांना जागृकतेत कमी चा सामना करावा लागेल आणि या वर्षाची सुरवात काहीशी कमजोर राहील. पुढील वर्षात परीक्षेत यशाचे योग बनत आहेत. वित्तीय दृष्ट्या हे वर्ष चढ उत्तरांनी भरलेले राहील. धन व्यय करण्यावर लक्ष द्या. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात चढ-उताराची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. स्वास्थ्य दृष्टिकोनाने अनुकूलता राहील. आपल्याकडून असे कुठले ही काम करू नका जे तुम्हाला आजारी करेल.